Rawa Thalipeeth

साहित्य- रवा १ वाटी, दही १/२ वाटी, आले मिरचि पेस्ट १ छोटा चमचा, गाजर ,कोबी आवडीप्रमाणे भाज्या किसुन, १ छोटा कांदा बारिक चिरुन, मिठ चविप्रमाणे, कोथिंबिर  १ चमचा, कडिपत्ता २-३ पाने बारिक चिरुन

रवा दहयात मिक्स करुन १५ मिनिट भिजवुन ठेवा. नंतर वरिल सर्व साहित्य त्यात मिसळुन अगदी किंचित सैलसर गोळा तयार करा. लागले तर थोडे पाणी मिक्स करा. व तव्यावर तेल लावुन त्याचे थालिपिठ लावा. झाकण ठेवुन भाजा. नंतर उलटुन परत १ मिनिट भाजा.  खुपच  सुंदर थालिपीठ होते.