Ravyache Laddu

साहित्य

बारिक रवा ३ वाट्या, साजुक तुप १/२ वाटी, दुध१/२ वाटी, पिठिसाखर चाळुन २ वाट्या, जायफळ पुड लहान चमचा, चारोळे, बेदाणे

क्रुती

रवा  दुध एकत्र भिजवुन ठेवणे. त्यात २चमचे  तुप गरम करुन घाला. २ तासाने हे पीठ् मिक्सरमधुन काढावे. नाँनस्टिक भांड्यात तुप गरम करा. मंद गँसवर हे मिश्रण  भाजावे. परातीत काढुन सर्व पदार्थ  यात मिसळावे.व लाडु वळावे.