Puliyogare Rice

साहित्य 

मसालाः तिळ २ चमचे,मेथि पाव चमचा,
काळे मिरे १/२ चमचा, तुर डाळ १ चमचा,
धने १ चमच, उडीद डाल १ चमचा, जिरे १ चमचा,
खोबरे २ चमचे, १० लाल मिरच्या, १ हळकुंड, तेल.
शिजवलेला भात, शेंगदाणे , चिंचेचा कोळ, गुळ,

कृती

प्रथम कढ्इत तेल घाला. त्यात मेथि मिरे भाजुन घ्या. त्यातच तुर डाळ, उडीद डाळ भाजा. धने, जिरे खोब्रे, तिळ भाजा. थंड झाल्यावर पावडर करा.

आता कढइत पाणी २ कप घाला. त्यात गुळ घाला.चिंचेचा कोळ घाला.गुळ पुर्न विरघळला  कि त्यात मसाला टाका. त्यात मिट घाला. २-३ मिनिट शिजु द्या.  दुसरया छोट्या भांड्यात फोडणी करा.  त्यात कडिपत्ता,हिंग, शेंगदाणे घालुन फोड्णि द्या. हि फोडणी वरील मसाल्यावर घाला. त्यात शिजवलेला भात मिक्स करा. कोथींबिर घालुन सव्ह करा.