Naralache Laddu

साहित्य

नारळाचा चव ३ वाट्या, साखर ३ वाट्या, तुप ४ चमचे, दुधाचि साय पाव वाटी, केशर, डेसिकेटेड खोबरे

क्रुती

नाँनस्टिक भांड्यात तुप घाला. गरम झाल्यावर नारळाचा चव साखर दुधाचि साय घालुन मंद गँसवर  शिजत ठेवा. तुप सुटायला लागल व घट्ट गोळा झालाकि केशर घाला. मिश्रण गार झाल्यावर लाडु वळा व डेसिकेटेड् खोबर्यात घोळा.