Mirchi Sangam bhaji

साहित्य  – बटाट्याची तयार भाजी, जाड लांब हिरव्या ढब्बु मिरच्या ५-६, बेसन पिठ, मिठ हळद, चिमुट्भर सोडा, ओवा, तळण्यासाठि तेल

प्रथम मिरच्या पोटात उभ्या चाकुने कट करुन अशा चिरा कि त्यात बटाट्याचि भाजी भरता येइल. बेसन पीठ मिठ, हळ्द सोडा घालुन भजीच्या पिठाप्रमाणे भिजवा. २ चमचे गरम तेलाचे मोहन घाला. मिरच्यांमधे भाजी भरुन घ्या. दाबुन मिश्रण बसवा. आता पिठात घोळुन तळुन घ्या.