Kaju Masala curry

साहित्य – काजु १/२ वाटि, काजु पेस्ट १/२ वाटी,  कादा बारिक चिरलेला १,२ टोमॅटो  प्युरी,  आले लसूण पेस्ट १ चमचा, गरममसाला १ छोटा चमचा, तिखट १ चमचा, जिरे १/२ चमचा, हिरवी वेलची २, काळे मिरे २-३,  ओले खोबरे २ मोठे चमचे, खसखस १/२ चमचा, मिठ चविनुसार

काजु  २ ते ३ तास भिजत ठेवा.  एका कढईत २ चमचे तेल घाला. त्यात जिरे हिरवी वेल्चि, मिरे घाला. परतल्यावर  त्यात आले लसुण पेस्ट व कांदा घाला. चांगल परतल्यावर त्यात खोबरे व खसखस परतुन घ्या.  नंतर गॅस बंद करुन थंड झाल्यावर सगळे मिक्सर करुन घ्या.

कढईत २-३ चमचे तेल घाला. त्यात तेजपत्ता घाला. व मिक्सर केलेला मसाला घाला. हलवुन घ्या. त्यात टोंमॅटो प्युरी घाला. तिखट मिठ  घाला. किंचित पाणी घाला. ५-६ काजुची पेस्ट करा. ति पण यात मिक्स करा. व हलवुन झाकण ठेवुन बारीक गॅसवर ठेवा. याला आता तेल सुटु लागेल. आता यात आख्खे काजु घाला.  व थोडे पाणी घालुन शिजवा.  शिजत आले कि गरम मसाला घाला. कोथिंबिर घाला व गॅस बंद करा.