Honey cake

हनी केक

३/४ कप दही, १ कप साखर, १/४ कप ओलिव्ह ऑइल किंवा सुर्यफुल तेल एकत्र मिक्स करा. साखर पुर्ण विरघळली पाहिजे. मैदा २ कप १ चमचा बेकिंग पावडर व १/२ चमचा सोडा एकत्र चाळून वरिल  मिश्रणात मिक्स करा व व्हेनिला इसेन्स घाला व चांगले फेटा. केकेपात्राला ग्रिसींग करुन मिश्र्ण त्यात ओता व मायक्रोव्हेव मधे १८० अंशावर ३० मिनिट बेक करा.

बेक झाल्यावर काढुन घ्या. त्याला काटेरी चमच्याने टोचे मारुन घ्या. एका पॅन मधे २ चमचे साखर व १/२ कप पाणी घाला. उकळुन साखर विरघळल्यावर गॅस बंद करा व कोमट झाल्यावर १/२ कप मध मिक्स करा व ते सायरप केकवर पसरवा. एका पंनमधे फ्रुट जाम घाला. गॅस मंद ठेवा. जाम पातळ झाल्यावर तो केकवर पसरवा. त्यावर खोबर्याचि पावडर टाकुन सजवा.