Cake n0 oven

साहित्य ः दहि १/२ कप  तेल १/२ कप, बेकिंग सोडा १/२ टी.स्पुन, बेकींग पावडर १ टी.स्पुन, पिठि साखर १ कप , मैदा २ कप, १/२ कप दुध

एका बाउल मधे दही साखर व तेल मिक्स करा. ते चांगले एक्जीव होईपर्यत फेटा. नंतर त्यात मैदा बेकींग पावडर व सोडा एकत्र करुन चाळुन घाला. व मिक्स करा. १/२ कप दुध मिक्स करुन हे मिश्रण चांगले फेटुन घ्या. नंतर त्यात आवडीप्रमाणे ड्रायफुड्स व टुटीफ्रुटी घाला. व्हानिला इसेन्स घाला. व परत एक्दा फेटुन घ्या.

कुकर मधे एक जाड नॅपकिन पसरा  व गॅस बारिक चालु करा. फेटलेले मिश्र्ण  सिल्व्हर फोइल चे ज बोक्स मिळतात त्यात ओता . २-३   बोक्स लागतील. हे बोक्स कुकरमधे ठेवा. २० ते २५ मिनिट अगदी बारिक गॅसवर ठेवा  व केक करा.