Dahi aloo veg

साहित्य – ५-६ बटाटे, १ वाटी दही, जिरे १ चमचा, ओवा १/२ चमचा, हिंग, १ लाल सुकि मिरची, गरम मसाला १ चमचा, कसुरी मेथी १/२ चमचा, तिखट १ चमचा, मिठ चविनुसार, कांदा मिडियम २, आले लसुण पेस्ट  १ चमचा.

बटाटे उकडुन घ्या. फक्त १ शिटी करुन उकडा. काढुन थंड झाल्यावर साले काढुन घ्या. कढईत तेल घालुन सोनेरी रंगावर तळुन घ्या.  बटाट्या ला  काटेरी चमच्याने टोचे मारुन घ्या. म्हणजे मसला आत मुरेल. कढईती ल तेलात जिरे ओवा व हींग घाला. त्यात कांदा घाला.  परतुन घ्या. लाल मिर्ची व आले लसूण पेस्ट घाला  व हलवुन बटाटे घाला. तिखट व मिठ घाला धने पावडर १ चमचा घाला. हलवुन दही घाला. व भरभर हलवा.  व थोडे पाणी घाला कसुरी मेथी घाला.   व झाकण ठेवुन २-३ मिनिटे भाजी शिजवुन घ्या. झाकण काढुन गरम मसाला व कोथिंबिर घाला.