राजमा

साहित्य – राजमा २ वाट्या. २ कांदा, २ टोमॅटो, आले लसुण पेस्ट, तिखट, मिठ, १ तेजपत्ता, दालचिनी  १छोटा तुकडा, २ काळे वेलची,

राजमा  ७-८ भिजत घाला.  चांगले भिजल्यावर कुकरमधे शिजवायला ठेवा शिजवायला ठेवताना त्यात दालचिनी, वेलची व्तेजपत्ता घालणे. कुकरच्या ६-७ शिट्ट्या करुन घ्या. टोमॅटोचि प्युरी करुन घ्या. कांदा पेस्ट करुन घ्या.

कढईत २-३ चमचे तेल घाला. जिरे मोहरीम घाला. आले लसुण पेस्ट घाला.  कांदा पेस्ट घाला चांगले परतुन त्यात टोमॅटो प्युरी घाला. तिखट, धने पावडर व मिठ, हळद घाला. किंचित पाणी घाला व झाकण ठेवा. तेल सुटु लागल्यावर त्यात शिजलेले रजमा घालुन हलवा व शिजु द्या. १-२ कप पाणी घाला. व गरम मसाला घाला शेवटी  कोथिंबिर घालुन गॅस बंद करा.